
निवडणुकी मतदानादरम्यान, नोकरदारांना विशेष सुट्टी जाहिर करण्यात येते. मात्र, बहुतांश लोक सुट्टी घेऊन पिकनिकचा प्लान करतात. अशा मतदान न करणाऱ्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी निवडणुक आयोगाने नवा प्लॅन आखला आहे. याची सुरुवात गुजरात विधानसभा निवडणुकीपासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Gujarat firms sign MoU with Election Commission, to name, shame workers who don vote)
निवडणुक आयोगाचा प्लॅन काय?
निवडणूक आयोगाने 1 हजाराहून अधिक कार्पोरेट कंपन्यांसोबत एक करार केला आहे. त्यानुसार या खासगी कंपन्या मतदानाची सुट्टी घेणाऱ्या आणि मतदान न करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणार आहे.
त्यासाठी खासगी कंपन्या नोडल अधिकारी नियुक्त करणार आहे. हा अधिकारी मतदान न करणाऱ्या नोकरदारांवर लक्ष ठेवणार आहे. एवढेच नव्हे तर मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नाव कंपनीच्या वेबसाईटवर झळकणार आहे. तसेच नोटीस बोर्डावरही अशा कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले जाणार आहे.
गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही 233 एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी या कंपन्या आमची मदत करणार आहेत. गुजरातमध्ये पहिल्यांदा 1,017 कॉर्पोरेट कंपन्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे, असं पी. भारती यांनी सांगितले आहे.
आयोगाकडून गुजरामध्ये 100 हून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या उद्योगांवर लक्ष देण्यात येणार आहे. या उद्योगांना त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे. मतदान न करणाऱ्या कामगारांची हे अधिकारी यादी तयार करतील. अशाच प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील मतदान न करणाऱ्या कामगारांवरही नजर ठेवली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.