
बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा अहमदाबादमधला आश्रम गुजरात सरकार ताब्यात घेण्याची शक्यता आहे. भारतात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करण्यात येत असून या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आश्रमाची जाहा गुजरात सरकार ताब्यात घेऊ शकतो. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाच्या दाव्यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी मास्टर प्लॅन आखला जात असून त्यात आसाराम बापूच्या आश्रमासह जागेचाही समावेश आहे.