गुजरात : बनावट दारू प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujarat hooch tragedy 7 dead in botad district after consuming spurious liquor

गुजरात : बनावट दारू प्यायल्याने 7 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर

Gujarat Hooch Tragedy : गुजरातमधील बोताड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारू प्यायल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 10 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असताना तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर बनावट दारू तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे.

गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांना सांगितले की, कोठडीत असलेल्या तिघांची चौकशी केली जात आहे. तत्पूर्वी, मृतांपैकी एकाच्या पत्नीने सांगितले होते की, रविवारी रात्री बनावट मद्य प्राशन केल्यानंतरच पतीची तब्येत बिघडली. बनावट दारू प्यायल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या हिम्मतभाई नावाच्या व्यक्तीने सांगितले की, यामुळे किमान 15 लोक आजारी पडले आहेत.

हेही वाचा: भाजपच्या cm बैठकीत फडणवीस का?, महाजनांचे उत्तर

Web Title: Gujarat Hooch Tragedy 7 Dead In Botad District After Consuming Spurious Liquor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gujaratdrinking liquor
go to top