भाजपच्या CM बैठकीत फडणवीस का?, महाजनांचे उत्तर

girish mahajan to manisha kayande over fadnavis present in bjp mukhyamantri parishad meeting
girish mahajan to manisha kayande over fadnavis present in bjp mukhyamantri parishad meeting

नवी दिल्ली : भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला पीएम नरेंद्र मोदीही उपस्थित होते. दरम्यान, या परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का उपस्थित नव्हते? यावरून आता एक नवीन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.

कायंदे काय म्हणाल्या होत्या..

दिल्लीतील मुख्यमंत्री परिषदेसाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नव्हते. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यासंदर्भात, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ट्वीट करत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस यांना टोला लगावला. कायंदे यांनी ट्वीट करत, भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री परिषदे आयोजित केली होती. मात्र यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उपस्थिती लावली की काय, म्हणजे एकनाथ शिंदे नावालाच मुख्यमंत्री आहे तर.. असे म्हणत त्यांनी टोमणा मारला. यावर भाजप नेते गिरिश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

girish mahajan to manisha kayande over fadnavis present in bjp mukhyamantri parishad meeting
Shivsena V/S BJP : दिल्लीत शिंदेंऐवजी फडणवीस; नक्की मुख्यमंत्री कोण? ठाकरेंच्या सेनेचा सवाल

महाजन म्हणाले की..

या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देत कांयदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "ही बैठक भाजपची होती, सरकारी पातळीवर नाही. त्यामुळे या बैठकीला केवळ भाजपचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मनीषा कायंदे यांनी 'ट्रोल' गिरी न करता थोडी माहिती घेऊन बोलले तर बरे होईल", अशा शब्दात त्यांना उत्तर दिले आहे.

girish mahajan to manisha kayande over fadnavis present in bjp mukhyamantri parishad meeting
झोपेच्या गोळ्यांची विक्री नशेसाठी; अन्न आणि औषध विभागाची पुण्यात कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com