

A devastating road accident on the Bhuj-Khavda National Highway in Kutch, Gujarat, killed seven members of Army families after a car collided with a speeding trailer truck. In a separate accident in Kota, Rajasthan, nine members of a Maharashtra family al
esakal
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव ट्रेलर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत लष्करी जवानांच्या कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.