साप चावला माणसाला अन् माणूस चावला सापाला...

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मे 2019

सापाने दंश केल्यानंतर पर्वत यांनी उलटी केली व सापाला पकडून चावा घेतला. यावेळी सापाही मेला.

अहमदाबादः सापाने दंश केल्याच्या रागातून एका ज्येष्ठ नागरिकाने (वय 70) सापाचा चावा घेतला. या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील अजन्वा या गावात ही घटना घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी पर्वत गाला बारिया हे शनिवारी (ता. 4) दुपारी ट्रकमध्ये वस्तू भरत होते. यावेळी अडगळीतून अचानक निघालेल्या सापाने पर्वत यांना दंश केला. सापाने दंश केल्याच्या रागातून पर्वत यांनीही सापाला हातात धरून त्याचा चावा घेतला. पर्वत यांना उपचारासाठी गोध्रा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान पर्वत यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सापाचाही मृत्यू झाला.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सापाने दंश केल्यानंतर पर्वत यांनी उलटी केली व सापाला पकडून चावा घेतला. यामध्ये सापाचाही मृत्यू झाला. उपस्थितांनी पर्वत यांच्या घरी ही माहिती दिली. कुटुंबियांनी मेलेल्या सापाला जाळले. पर्वत यांना उपचारासाठी त्यांना जवळील लुनावडा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat man kills snake with retaliatory bite