
गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट या सहा महानगरपालिकांचे निकाल लागले असून या सहाही पालिकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.
गांधीनगर- गुजरातमधील स्थानिक महापालिका निवडणुकीचे मंगळवारी निकाल जाहीर झाले. राज्यातील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट या सहाही महापालिकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.
320 कोटी युजर्सचे ID, Password हॅक; चेक करा तुमचं अकाउंट सुरक्षित आहे का?
आम आदमी पार्टीने सूरतमध्ये आठ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला या ठिकाणी एकाही जागा अद्याप मिळू शकलेली नाही. जामनगरमध्ये बसपाने तीन जागांवर तर पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने अहमदाबादमध्ये चार जागांवर विजय मिळवला आहे.
धन्यवाद गुजरात!
राज्यभर में म्युनिसिपल चुनावों के परिणाम साफ दिखाते हैं कि लोगों ने विकास और सुशासन की राजनीति पर अपना भरोसा जताया है। भाजपा पर एक बार फिर विश्वास जताने के लिए राज्य के लोगों का आभारी हूं। गुजरात के लोगों की सेवा करना हमेशा से सम्मान की बात रही है।
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार
गुजरातच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. मोदींनी ट्विट करुन म्हटलं, "गुजरातचे धन्यवाद! राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट संदेश देतात की लोकांमध्ये विश्वास आणि सुशासनाच्या राजकारणाप्रती मोठा विश्वास आहे. भाजपवर पुन्हा भरवसा दाखवल्याबद्दल मी राज्याच्या जनतेचा आभारी आहे. गुजरातची सेवा करणं आमचा सन्मान आहे."
गुजरात निकाय चुनाव में भाजपा को 85% सीटें जीताकर जनता ने एक बार पुनः सिद्ध किया है कि गुजरात भाजपा का गढ़ है।
कोरोना व किसान आंदोलन से जुड़ी भ्रांतियों को नकार कर जनता ने @narendramodi जी के नेतृत्व में भाजपा की विकासनीति पर पुनः विश्वास जताया है।@BJP4Gujarat इकाई को बधाई। pic.twitter.com/jQGapuauEU
— Amit Shah (@AmitShah) February 23, 2021
आजवरचा सर्वात चांगला निकाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील महापालिका निवडणुकीच्या निकालावर बोलताना म्हणाले, "या निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आहे. संपूर्ण गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळल्या आहेत. गुजरातमधील महापालिका निवडणुकीचा हा निकाल हे दर्शवतो की, भाजपाने पुन्हा एकदा आपला गड राखला आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी विकासयात्रा सुरु झाली होती ती भाजपाने आजही कायम राखली आहे. आज जो निकाल आल आहे तो आजवरचा सर्वात चांगला निकाल आहे."