320 कोटी युजर्सचे ID, Password हॅक; चेक करा तुमचं अकाउंट सुरक्षित आहे का?

id password hack
id password hack

नवी दिल्ली - स्मार्टफोन हातात आल्यापासून ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच डेटा लीक होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. आधी ऑनलाइन डेटा लीक वर्षातून एक दोन वेळा होताना दिसायचं. मात्र आता ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म वाढल्यानंतर डेटा लीकच्या घटना सातत्याने होत आहेत. 

हॅकिंग झाल्याच्या बातम्या हल्ली सतत येत असतात. आताही जवळपास 300 कोटींहून अधिक ई मेल आयडी आणि पासवर्ड लीक झाल्याची बातमी आली आहे. द सनच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इंटरनेट युजर्सची अकाउंट हॅक करण्यात आली आहेत. आतापर्यंतचे हे सर्वात मोठे हॅकिंग असल्याचा दावाही करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार 3.2 बिलियन म्हणजेच जवळपास 320 कोटी ई मेल आयडी पासवर्ड लीक झाले आहेत. 

जीमेल शिवाय नेटफ्लिक्स आणि लिंक्डइन प्रोफाइलसुद्धा लीक झाले आहेत. रिपोर्टनुसार यावेळी तब्बल 11 कोटी 7 लाख लोकांचे लिंक्डइन आणि नेटफ्लिक्स अकाउंट हॅक झाले आहेत. पहिल्यांदाच डेटा लीक प्रकरणी लोकांचे नेटफ्लिक्स आणि लिंक्डइन प्रोफाइलचा समावेश आहे. हॅकिंगमधून जवळपास 1500 कोटी अकाउंट हॅक केली आहेत. तर 300 कोटींहून अधिक लोकांचे ई मेल आणि पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत. 

हॅक झालेल्या अकाउंटमध्ये नेटफ्लिक्स आणि गुगलला एकच पासवर्ड वापरणाऱ्यांच्या खात्यांचा समावेश आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सचा हा डेटा इंटरनेटवर अपलोड करण्यात आला आहे. हॅकर्स या डेटाचा वापर करून तुमची इतर अकाउंट हॅक करू शकतात. 

चेक करा तुमचं अकाउंट तर हॅक झालं नाही ना?
तुम्हालाही अकाउंट हॅक झाल्याचा संशय असेल तर तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी https://cybernews.com/personal-data-leak-check/ क्लिक करा. या साइटवर तुमचा ईमेल आयडी टाकून माहिती चेक करू शकता. तसंच आणखीही काही साइट आहेत ज्यावर तुम्हाला याची माहिती मिळू शकते. haveibeenpwned.com वेबसाइटवरसुद्धा तुमचा आयडी पासवर्ड हॅक झाला आहे की नाही हे समजेल. 

भारत भारत भारत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com