
गुजरातमध्ये मनरेगा योजनेत घोटाळा प्रकरणी मंत्र्याच्या मुलाला अटक झालीय. गुजरात सरकारमध्ये मंत्र्याच्या मुलावर तिसरा गुन्हा दाखल झाला असून यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय. काही दिवसांपूर्वीच तो एका प्रकरणात जामीनावर बाहेर आला होता. पण आता नव्या प्रकरणात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सरकारी पैशांचा दुरुपयोग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मनरेगाची कामं पूर्ण नसताना कोट्यवधींची बिलं काढल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. बलवंत खाबड असं त्याचं नाव आहे.