Morbi Bridge : "डास मारण्याची रॅकेट बनवणाऱ्या कंपनीकडे होतं पुलाच्या देखभालीचं कॉन्ट्रॅक्ट?"

सुरक्षा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय हा ब्रीज जनतेसाठी खुला करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
cable bridge collapsed in the Machchhu river Morbi area  Several people fear injured
cable bridge collapsed in the Machchhu river Morbi area Several people fear injured Sakal

गुजरातमधल्या मोरबी इथला झुलता पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेवरुन आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सोशल मीडिया स्टार प्रसाद वेदपाठकनेही आता पुलाच्या बांधकामावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रसादने याबद्दल ट्वीट केलं आहे.

cable bridge collapsed in the Machchhu river Morbi area  Several people fear injured
Morbi Bridge Collapse: पूल दुर्घटनेला व्यवस्थापनातील लोक जबाबदार? पोलीस म्हणतात...

प्रसाद वेदपाठकचं प्रसिका नावाने सोशल मीडियावर अकाऊंट आहे. तो चांगलाच पॉप्युलर आहे. तो ट्वीटच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांवरही भाष्य करत असतो. त्याने मोरबी पूल दुर्घटनेबद्दल ट्वीट केलं आहे. यामध्ये तो म्हणतो, "Wall clock, Mosquito Racket, Home Appliances etc. बनवणाऱ्या कंपनी ला Morbi Bridge च्या देखभालीचा कॉन्ट्रॅक्ट कोणी आणि का दिला ? नूतनीकरणानंतर Safety Certificate घेतल्या शिवाय ब्रिज पब्लिक साठी ओपन करण्याची परवानगी कोणी दिली ? १४१ लोकांच्या दुःखद मृत्यूस कोण जबाबदार ?

गुजरातमध्ये मोरबी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये १४० पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे देशभरात खळबळ माजली आहे. हा पूल कसा पडला, याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com