

Ahmedabad Fireworks Factory
ESakal
गुजरातच्या अहमदाबादमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी भीषण आग लागून मोठा अपघात झाला. महमूदपुरा भागातील गेटरोड रोडवरील टॅलेंट फायरवर्क्स कारखान्यात अनेक मोठे स्फोट झाले आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग विझवण्यासोबतच मदत आणि बचाव कार्य सुरू केले.