
सक्रिय राजकारणात प्रवेश नाही : नरेश पटेल
अहमदाबाद : आपण सध्यातरी सक्रिय राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण गुजरातेतील पाटीदार समाजातील वजनदार नेते नरेश पटेल यांनी आज दिले. राजकोट जिल्ह्यातील खोडलगाममध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे, याबाबतच्या गेल्या सहा महिन्यांच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
गुजरातेत डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी पक्षाला आशा होती. त्यासाठी, नुकतेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर पटेल यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या होत्या. पटेल म्हणाले, की पाटीदार समुदायातील युवक आणि महिलांची मी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असली तरी ज्येष्ठ पूर्णपणे विरोधात होते. मी राजकारणात प्रवेश केल्यास सर्व समुदायांना न्याय देऊ शकणार नाही, असे ज्येष्ठांनी सांगितले.
Web Title: Gujarat Patidar Leader Naresh Patel Drop Plan To Join Active Politics Ahmedabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..