बाबो, केवढी ही गर्दी; गुजरातमध्ये कोरोना नियम धाब्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Sanand

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. नवापुरा गावच्या सरपंचांसह २४ जणांविरुद्ध महामारी आपत्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबो, केवढी ही गर्दी; गुजरातमध्ये कोरोना नियम धाब्यावर (Video)

अहमदाबाद : संपूर्ण गुजरात (Gujarat) राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने (Corona 2nd wave) थैमान घातले आहे. तेथील रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर अहमदाबाद जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर अरे कोरोना आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. एका धार्मिक कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येत जमा झाल्या होत्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल होत आहे. यावेळी, कोरोना प्रतिबंधक नियम अक्षरश: धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. या सर्व महिला बलिया देव मंदिरात एकत्र येणार होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांपैकी २४ महिलांना कोविड प्रोटोकॉल तोडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. (Gujarat Police takes action against devotees in Sanand after violate COVID protocols for religious event)

हेही वाचा: बिल, मेलिंडा आणि ती; लग्नावेळी गर्लफ्रेंडबाबत केला होता करार

मध्य गुजरातच्या सानंदमध्ये ही घटना घडली. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नवापुरा आणि निधार्ध या गावात महिला पूजेसाठी एकत्र आल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता डोक्यावर कलश ठेवून त्या रस्त्यावरून मोठ्या संख्येत निघाल्या होत्या. यावेळी मोठ्या आवाजात संगीतही वाजवले जात होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. नवापुरा गावच्या सरपंचांसह २४ जणांविरुद्ध महामारी आपत्ती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संगीत वाजविणाऱ्या आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवरही कारवाई केली आहे.

हेही वाचा: गरीब मराठा समाजावर अन्याय झाला - आंबेडकर

गुजरातमध्ये अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यूसारखे निर्बंध लावण्यात आले आहेत. मंगळवारी (ता.४) राज्यात १३ हजार ५० नवे रुग्ण आढळले असून १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ६ लाख २० हजार ४७२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार २९७ वर पोहोचली आहे. अहमदाबाद हा राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्हा आहे. येथे रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ४३६ आहे.

Web Title: Gujarat Police Takes Action Against Devotees In Sanand After Violate Covid Protocols For Religious

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..