गुजरात, हिमाचलमध्ये 'कमळ'; मोदी लाट कायम!

सोमवार, 18 डिसेंबर 2017

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट झाले. भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. 

गुजरातमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली असून, तब्बल सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्येही भाजपने सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत विजय मिळविला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंतचा कल पाहता भाजप शंभरावर जागा मिळवून आघाडीवर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली आहे. तेथेही भाजपला स्पष्ट बहुमत दिसते आहे. 

मतमोजणीनंतरच्या पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा आघाडीवर आला. सकाळी दहानंतर मात्र गुजरातमधील कल भाजपच्या दिशेने वळायला लागला. हिमाचलमध्ये भाजपकडे सुरूवातीपासून आघाडी आहे. 

कल असा
गुजरात विधानसभा निकाल/कल: (दुपारी दोनपर्यंत)
एकूण जागा: 182
भाजपः 101
काँग्रेसः 76
अपक्ष/इतर: 2

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल/कल: (दुपारी दोनपर्यंत)
एकूण जागा: 68
भाजपः 43
काँग्रेसः 21
अपक्ष/इतर: 4

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट झाले. भाजपने विजयाचा षटकार मारला आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. 

#GujaratVerdict | Gujarat Assembly Election Result 

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, "ओबीसीं'चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली. 

हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.

Web Title: gujarat result gujarat elections gujaratverdict Gujrat himachal pradesh bjp leads