गुजरात - गॅस गळतीमुळे ६ जणांचा मृत्यू, २० जण अत्यवस्थ

Suraj GIDC
Suraj GIDCANI
Summary

गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना घडली. यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना अत्यवस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

सुरत - गुजरातमध्ये (Gujrat) एका प्रिंटिंग मिलमध्ये गॅस लिक झाल्यानं ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण अत्यवस्थ असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सध्या बचावकार्य सुरु आहे. सुरतमधील (Surat) एका कंपनीत हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरतच्या सचिन जीआयडीसी परिसरात प्रिंटिंग मिल आहे. तिथं गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना घडली. यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना अत्यवस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर ओमकार चौधरी यांनी दिली.

Suraj GIDC
"मोदींचा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी होता"

कंपनीजवळ असणाऱ्या नाल्यात एक टँकर चालक केमिकल टाकत होता. तेव्हा त्यामधून विषारी वायुची गळती सुरु झाली. यामध्ये प्रिंटिंग मिलच्या कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. विषारी गॅसबाबत समजेपर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला होता अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com