काळा पैसा पांढरा करण्यासाठी गुजरात सर्वांत पुढे?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : काळा पैसा पांढरा म्हणजेच अधिकृत कसा करायचा याबद्दल गुगलवर सर्च करणाऱ्यांमध्ये गुजरात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि हरियाना येथून याबद्दल सर्वाधिक गुगल सर्च करण्यात आले आहेत. 

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली असल्याचे गूगल सर्चसंबंधातील निरीक्षणांवरून दिसून आले आहे. ‘ब्लूमबर्ग’ने याबाबत अहवाल दिला आहे. 

“How to convert black money into white money” असे गुरुवारी दिवसभरात सर्वात जास्त प्रमाणात सर्च करण्यात आले. सर्च करणाऱ्यांमध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या आणि हरियाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वापरात असलेल्या 86 टक्के नोटा निरर्थक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकांनी बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली. मात्र पैसे जमा करण्यासाठी अडीच लाखांची मर्यादा देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याच्या उत्पन्नाचा स्रोत द्यावा लागणार आहे. त्यामुळे अधिकृत स्त्रोत नसलेल्या लोकांची पंचाईत झाली आहे. 
 
Web Title: Gujarat tops list of searches for 'How to convert black money into white money' on Google