
गुजरातच्या (Gujarat) वडोदरामध्ये (Vadodara) एक अजब प्रकार समोर आला आहे.
वडोदरा- गुजरातच्या (Gujarat) वडोदरामध्ये (Vadodara) एक अजब प्रकार समोर आला आहे. शहरातील एका मुलाने आपल्या 50 वर्षीय आईचा काचेचा तुकडा मारुन हत्या केली आहे. त्यानंतर आपल्या आईच्या मृतदेहाला त्याने पेट्रोल टाकून जाळून टाकले. घटनेची माहिती मिळताच घरी पोहोचलेल्या बहिणीने आईच्या हत्येचे कारण भावाला विचारताच धक्कादायक उत्तर मिळालं. ''स्वर्गीय वडिलांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं होतं की, आईला वरती पाठवून दे, त्यामुळे मी तिला मारून टाकलं, असं उत्तर त्याने दिलं''. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
क्रूर मुलाने केलेल्या या कृत्यामुळे वडोदरा परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुलगा दिव्येशने आधी आपल्या आईच्या छातीवर आणि नंतर पोटात काचेचा तुकडा मारुन हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला घराच्या मागे पेट्रोल टाकून जाळले. त्यानंतर आपल्या आईच्या मृतदेहाजवळ उभा राहून तो 'ओम नम: शिवाय'चा जप करु लागला. त्यानंतर शेजाऱ्यांनी ही घटना पाहतात पोलिसांना याची सूचना दिली.
Breaking News: केंद्रीय आरक्षण वाढविण्यासाठी आता दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती...
या घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देताना बहिणीने सांगितले की, मी जेव्हा घरी आले, तेव्हा भावाला विचारलं की त्याने आईला का मारलं. भावाने मला वडिलांच्या आलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले.
27 वर्षीय दिव्येश बारिया चालक आहे. सोमवारी रात्री दिव्येशने बॉटलीचा काच आईच्या पोटावर आणि छातीवर मारला. आईचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी दिव्येशने आपल्या आईचा मृतदेह घराच्या मागे नेला आणि त्याला पेट्रोल टाकून जाळले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भारत