esakal | गवार , तूर यातला फरक कळत नाही; केजरीवाल आणि राहुल गांधींवर भाजप नेत्याची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

kejariwal and rahul gandhi

दिल्ली एक शहर असून त्याला राज्याचा दर्जा मिळाला आहे. त्या राज्याचे एक मुख्यमंत्रीसुद्धा आहेत. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना शहराच्या महापौरांएवढीच ताकद असल्याचचं त्यांनी म्हटलं.

गवार , तूर यातला फरक कळत नाही; केजरीवाल आणि राहुल गांधींवर भाजप नेत्याची टीका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबाद - देशात कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र आंदोलन सुरू आहे. यावरून राजकीय वातावरणही तापलं असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. आता गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. दोघांना कृषी उत्पादनांबाबत असलेल्या ज्ञानावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 

सीआर पाटील यांनी केजरीवाल यांना कादगी वाघ म्हटलं आहे तर काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेते सीआर पाटील सूरत जिल्ह्यातील बारदोलीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जेव्हा काँग्रेस सत्तेत होते तेव्हा ते कृषी क्षेत्रात सुधारणांच्या बाजूने होते. दिल्ली एक शहर असून त्याला राज्याचा दर्जा मिळाला आहे. त्या राज्याचे एक मुख्यमंत्रीसुद्धा आहेत. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांना शहराच्या महापौरांएवढीच ताकद असल्याचचं त्यांनी म्हटलं.

हे वाचा - Farmers Protest : केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र PM मोदींनी केलं ट्विट; म्हणाले...

केजरीवाल सध्या देशातील राजकारणात दबदबा व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. ते कागदी वाघ आहेत. त्यापेक्षा जास्त काही नाहीत असाटी टोला पाटील यांनी लगावला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यातून भाजप लोकांना तीनही कृषी कायद्यांबाबत माहिती देत आहे.

हेही वाचा - 'प्रिय, शेतकरी बंधू आणि भगिनींनो...' केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लिहलं 8 पानी पत्र

सूरतमधील सभेत पाटील यांनी म्हटलं की, मला काहीच शंका नाही की केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी गवारी आणि तूर यातील फरक माहिती नसेल. असे लोक शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलत आहेत. फक्त काही राज्यातील शेतकरीच आंदोलनात सहभागी होत आहेत. 

loading image