esakal | गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू

गुजरातमधील भरूच इथं एका कोविड रुग्णालयात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग; 16 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबाद - गुजरातच्या भरूच इथं एका कोविड रुग्णालयात आग लागली आहे. या आगीत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भरुचा इथल्या पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागल्याचं समजतं. पडेल वेलफेअर रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी कोविड सेंटर उभारलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

भरूचचे पोलिस अधीक्षक राजेंद्र सिंह चुडासमा यांनी सांगितलं की, आय़सीयू वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली. रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात येईपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालयात आग लागली तेव्हा तिथे 58 रुग्ण होते. घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेचा आढावा घेतला जात आहे. तसंच मृत्यूची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली.

हेही वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जगातील ४० ते ४५ टक्के बळी भारतात

रुग्णालयात आग लागल्यांतर तिथल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर जवळच्याच रुग्णालयात त्यांना दाखल केलं. आग इतकी भीषण होती की आगीच्या विळख्यात अनेक रुग्ण सापडले. प्राथमिक तपासात आयसीयू वॉर्डात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात असून अधिक तपास केला जात आहे.