गरबा कार्यक्रमात गोंधळ; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मुस्लिम बाउन्सर्सला मारहाण

bajrang dal attack
bajrang dal attack

सुरत - गुजरातमधील सुरत येथील गरबा कार्यक्रमात लाकडी दांडके घेऊन काही जणांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. तसेच तेथे तैनात असलेल्या बाऊन्सरवर हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा सुरतमधील व्हीआयपी रोडवरील ठाकोरजी वाडीत घडली. या हल्ल्यात दोन बाउन्सर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

bajrang dal attack
मला माघार घेण्यास सांगण्यासाठी अनेकांनी राहुल गांधींकडे आग्रह केला : शशी थरूर

काही बाउन्सर्सने घटनास्थळावरून पळ काढल्यामुळे ते बचावले. याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. आत घुसलेले लोक बजरंग दलाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्री घटनास्थळी पोहोचलेले झोन ४ चे उपायुक्त सागर बागमेर यांनी सांगितले की, 'घटनेची माहिती मिळताच आमची टीम घटनास्थळी पोहोचली. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. काही तरुण लाकडी दांडके घेऊन गरबा कार्यक्रमात आले होते, त्यांनी गरबा कार्यक्रमाच्या आयोजकांशी वाद घातला आणि गरबा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही बाउन्सरना मारहाण केली. या घटनेबाबत अद्याप कोणीही गुन्हा नोंदविण्यास पुढे आलेले नाही.

याच गरबा कार्यक्रमासाठी आम्ही पोलीस कर्मचारी तैनात केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती बागमेर यांनी दिली.

bajrang dal attack
पूर्वी मोदी शेतकरी समर्थक होते, दिल्लीत आले अन् बदलले; भाजप नेत्याचा घरचा आहेर

बाऊन्सर्सपैकी अहमद खान यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमात शंभरहून अधिक बाउन्सर होते. बजरंग दलाचे सदस्य चारही बाजूंनी असलेले पडदे फाडून आत शिरले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोबत लाकडी दांडके आणले होते. पहिल्यांदा त्यांनी एका बाउन्सरला नाव विचारले. तो बाऊन्सर मुस्लिम असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर नेवून मारहाण केली. यावेळी पाच मुस्लिम बाउन्सर्सना मारहाण करण्यात आली. त्यापैकी तीन जण घटनास्थळावरून पळून गेले.

दक्षिण गुजरात बजरंग दल (सुरक्षा) चे अध्यक्ष देवप्रसाद दुबे म्हणाले की, आम्ही याआधीच कार्यक्रम आयोजकांना मुस्लिम तरुणांना बाउन्सर न लावण्याची ताकीद दिली होती. मात्र तरी देखील ठाकोरजी वाडी येथे गरबा कार्यक्रमाच्या आयोजकांनी मुस्लीम बाउन्सर्सची नेमणूक केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com