हार्दिक पटेल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप

अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य काही जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

भाजप आमदाराच्या कार्यालयावर जुलै 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप हार्दिक पटेल आणि लालजी पटेल यांच्यावर आहे; मात्र या अटक वॉरंटचा गेहलोत आणि भरत सोळंकी यांनी निषेध केला आहे.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. निवडणूक आयोगाने आज गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 89 जागांवर नऊ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. हार्दिक पटेल यांनी आज राजकोट जिल्ह्यातील जसदन ब्लॉक गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी हार्दिक पटेल यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये भाजप आणि कॉंग्रेसला निवडणुकीच्या शुभेच्छा देत आजपासून दोन महिने जनता राज असेल, असे स्पष्ट केले आहे.

Web Title: gujrat news Non-bailable Warrant Against Hardik Patel