

पालनपूर : कोकणातील रत्नागिरीत आठवड्याभरापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील बांधकाम सुरु असलेला ब्रीज कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज गुजरातमध्ये पालनपूर इथं एक बांधकाम सुरु असलेला ओव्हर ब्रीज कोसळला.
यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पालनपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. (Gujrat under construction bridge collapsed one dead video went viral)
पालनपूरमध्ये एक रेल्वे क्रॉसिंग आहे त्यावर एक ब्रीज उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी दोन खांबांच्यादरम्यान जे गर्डर टाकण्यात आले होते. या कामात काहीतरी मेकॅनिकल बिघाड झाल्यानं ते कोसळल्याचं प्राथमिकदृष्ट्या अंदाज वर्तवला जात आहे, अशी माहिती बनासकांठा पालनपूरचे जिल्हाधिकारी वरुण बरनवल यांनी दिली. (Latest Marathi News)
या घटनेच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम गांधीनगरहून रवाना झाली आहे. आज रात्रीपर्यंत याचा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे की, नेमकी कशामुळं ही दुर्घटना घडली. हा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत स्पष्टपणे काही सांगता येईल, पण सध्यातरी मेकॅनिकल फेल्युअरमुळं ही दुर्घटना घटल्याचा अनुमान आपण लावत आहोत, असंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)
या ढिगाऱ्यातून एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर बचावकार्य सध्या तिथं सुरु आहे. क्रेन्स आणि इतर उपकरणांच्या सहाय्यानं घटनास्थळावर क्लिअरिंगचं काम सुरु आहे. जशी दुर्घटनाग्रस्त जागा मोकळी केली जाईल, त्यानंतर आपल्याला इतर अतिरिक्त माहिती देखील उपलब्ध होईल, असंही यावेळी जिल्हाधिकारी बरनवल यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.