सेहवागवरील कठोर टीका मागे : जावेद अख्तर

पीटीआय
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिच्या सोशल मीडियावरील पोस्टसंदर्भात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्यावर कठोर शब्दांत केलेली टीका आपण मागे घेत आहोत, असे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी शुक्रवारी जाहीर केले. 

''सेहवाग हा महान खेळाडू आहे. गुरमेहरबाबत केलेले वक्तव्य हे गमतीतून केले असून, आपण तिच्याविरोधात नसल्याचा खुलासा सेहवागने केला असल्याने आपण आपले कठोर शब्द मागे घेत आहोत,'' असे अख्तर यांनी स्पष्ट केले.

गुरमेहरने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात सोशल मीडियावरून चळवळ सुरू केली तेव्हा सेहवागने तिला 'ट्रोल' केले होते. त्यावर 'कमी शिक्षित खेळाडू' अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी सेहवागवर टीका केली होती. 

सेहवागबद्दलची टीका मागे घेतानाच त्यांनी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचे कौतुक केले. गुरमेहरप्रकरणी आपण व्यथित झालो आहोत, असे त्याने ट्‌विटरवर म्हटले होते. 'ट्रोल'ची भीती न बाळगता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्याबद्दल गौतम गंभीरबद्दल मला आदर वाटतो, असे अख्तर म्हणले. अनेक वरिष्ठ व निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी गुरमेहरला पाठिंबा दिला आहे, मात्र काही जणांच्या दृष्टीने ते 'राष्ट्रवादी' नाहीत, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

Web Title: Gurmeher Kaur Virender Sehwag Javed Akhtar