दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेशी लढण्याची प्रेरणा कशी मिळाली? PM मोदी म्हणतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेशी लढण्याची प्रेरणा कशी मिळाली? मोदी म्हणतात...

नवी दिल्ली : गुजरात येथील लखपत साहीब गुरुद्वारामध्ये गुरुपर्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित दर्शवली होती. यावेळी त्यांनी शीख बांधवांना संबोधित केले. दहशतवाद (Terror) आणि धार्मिक कट्टरतावाद्यांशी (Religious Fanaticism) लढण्याची प्रेरणा कशी मिळाली? याबाबत मोदींनी वक्तव्य केलं.

हेही वाचा: मागील सरकारांनी वेळ वाया घालवला; पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुरुपर्वाच्या मुहर्तावर शीख बांधवांना संबोधित करताना मोदींनी शीख नेत्यांचे कौतुक केले. तसेच औरंजेबाविरुद्ध गुरु तेगबहाद्दुर यांनी दिलेल्या लढ्याचं शौर्य सांगितलं. गुरू तेगबहाद्दुर यांनी औरंगजेबाविरुद्ध जे शौर्य दाखवले त्यावरून देश दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेविरोधात कसा लढतो? याची प्रेरणा मिळाली. शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग साहिब यांचे जीवनही धैर्य आणि त्यागाचे जिवंत उदाहरण आहे. देशाच्या एकात्मेला कोणीही नुकसान पोहोचू शकणार नाही, याची काळजी घेणे महत्वाचे आहे, असं मोदी म्हणाले.

केंद्र सरकारने करतारपूर कॉरीडॉरचे काम पूर्ण केल्यामुळे आता सर्व शीख बांधवांना करतारपूर साहीबला सहज जाता येतं. शिखांचे चौथे गुरू भाई मोखम सिंगजी हे गुजरातमधील होते हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असंही मोदी म्हणाले.

Web Title: Guru Tegh Bahadur Teaches How Fights Against Terror And Religious Fanaticism Says Pm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi
go to top