गुरूद्वारा नमाजसाठी देणार जागा; मोकळ्या जागेवर नमाज पठनावरून सुरू होता वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gurugram
गुरूद्वारा नमाजसाठी देणार जागा; मोकळ्या जागेवर नमाज पठनावरून सुरू होता वाद

गुरूद्वारा नमाजसाठी देणार जागा

sakal_logo
By
सुधीर काकडे

हरीयाणाच्या गुरूग्राम शहरात गेल्या महिनाभरापासून उघड्यावर नमाज पठन करण्यावरून वाद सुरू आहे. बंजरंगदल सारख्या काही हिंदूत्वादी संघटनांसह स्थानिकांनी मोकळ्या जागेवर नमाज पठण करणाऱ्या मुस्लीम सामुदायाचा विरोध केल्याने, वाद निर्माण झाला होता. महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी या वादाची चर्चा असायची, मात्र त्यातच आता या ठिकाणहून एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. शुक्रवारच्या नमाजसाठी गुरूद्वारांच्या स्थानिक संघटनेने बुधवारी आपले दरवाजे उघडण्याची घोषणा केली.

गुरूग्राममध्ये असलेल्या स्थलांतरीत मुस्लीम सामुदायाला नमाज पठन करण्यासाठी प्रशासनाकडून काही जागा नेमून देण्याच आल्या होत्या. या जागांपैकी काही ठिकाणी स्थानिकांनी विरोध करायला सुरूवात केली. विरोध करताना स्थानिकांनी नमाज पठनाच्या वेळी जय श्री रामच्या घोषणा देत निदर्शनं केली. त्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमिवर गुरुद्वारा सिंग सभा समितीने पुढाकार घेतला असून, समितीशी संबंधित पाच गुरुद्वारांमध्ये मुस्लिमांना नमाज पठण करण्याची परवानगी घेण्यासाठी प्रशासनाकडे संपर्क साधणार असल्याचे सांगितले. कोविड प्रोटोकॉलशी तडजोड न करता लहान गटांमध्ये ही नमाज होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: नव्या वर्षात पगार वाढणार? मोदी सरकार लवकरच करणार घोषणा

"मोकळ्या जागेवर नमाजला विरोध होत असल्याचे समजताच आपल्याला वाईट वाटलं. गुरुद्वारांचे दरवाजे सर्वांसाठी नेहमीच खुले असतात. त्यामुळे जर मुस्लिमांना शुक्रवारच्या नमाजसाठी जागा शोधण्यात अडचणी येत असतील तर, त्यांचे गुरुद्वारांमध्ये नमाज अदा स्वागत आहे, ” अशा भावना समितीचे सदस्य हॅरी सिंधू यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गुरूग्रामध्ये गुरुद्वारा सिंग सभा समितीशी संबंधित पाच गुरुद्वारा आहेत. यामध्ये सदर बाजार सब्जी मंडी , सेक्टर 39 (मेदांता जवळ), सेक्टर 46, जेकबपुरा आणि मॉडेल टाऊन या गुरूजद्वारांचा समावेश आहे.

loading image
go to top