Gurugram Constable Case
esakal
Gurugram Constable End Life : हरियाणाच्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅबिनेट मंत्री राव नरबीर सिंह (Minister Rao Narbir Singh) यांच्या अधिकृत बंगल्यात तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा कॉन्स्टेबल गार्ड रूममध्ये तैनात होता आणि एका सहकाऱ्याला तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. यानंतर तातडीने ही माहिती मंत्र्यांना आणि पोलिसांना देण्यात आली. कॉन्स्टेबलला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.