
Summary
तपासात आरोपी हा ईव्हीआरमध्ये तैनात असलेला कॉन्स्टेबल विजय असल्याचे समोर आले.
सुरुवातीला पोलिस अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिल्याचा महिलेचा आरोप आहे.
सोशल मीडियावर प्रकरण उघड केल्यानंतर विजयला निलंबित करून एफआयआर दाखल झाला.
एका पोलिस हवालदाराला महिलेला आक्षेपार्ह मॅसेज पाठवणे चांगलंच महागात पडले आहे. त्याला निलंबित करण्यात आले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हरियानातील गुरुग्राममध्ये घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी सुरुवातीला महिलेची तक्रार नोंदवण्याऐवजी तिलाच प्रकरण मिटवण्याच सल्ला दिला, पण तिने ही बाब सोशल मीडियावर पोस्ट केली तेव्हा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.