'इतर ग्राहकांना त्रास होईल', दिव्यांग महिलेला रेस्तराँने प्रवेश नाकारला

Gurugram restaurant denied entry woman
Gurugram restaurant denied entry womane sakal

नवी दिल्ली : व्हिलचेअरवर आलेल्या एका दिव्यांग महिलेला रेस्टॉरंटने प्रवेश नाकारला. रेस्तराँने दिलेले कारण देखील धक्कादायक आहे. गुरुग्राममधील (Gurugram) एका सुप्रसिद्ध रेस्तराँमध्ये ही घटना घडली. याबाबत महिलेने ट्विट करून माहिती दिली आहे.

Gurugram restaurant denied entry woman
भाजप, सेनेसह राष्ट्रवादीला खिंडार? काँग्रेसमध्ये मेगा भरती

सृष्टी पांडे तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत खूप दिवसानंतर रेस्तराँमध्ये गेली होती. मात्र, रेस्तराँमधील कर्मचाऱ्यांनी व्हिलचेअर आत जाऊ शकत नाही, असं म्हटलं. इतर ग्राहकांना त्रास होतो, असं उत्तर त्या कर्मचाऱ्यांनी दिलं. कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे बोट दाखवून आम्हाला आत जाण्यापासून रोखले. त्यांनी सांगितलेले कारण ऐकून धक्का बसला, असं पाडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कर्मचाऱ्यासोबत खूप वाद झाला. त्यानंतर महिलेला बाहेर बसण्यास सांगितले. खूप थंडी वाजत होती आणि मी खूप वेळ थंडीत बसू शकत नाही. कारण माझे पाय दुखते. याचं मला खूप वाईट वाटलं. मला खूप वैताग आला होता, असं पांडे म्हणाली. याप्रकरणी कारवाईसाठी गुरुग्राम पोलिसांनी महिलेशी संपर्क साधला आहे.

रेस्टॉरंट व्यवस्थापनाने मागितली माफी -

गुरुग्राममध्ये DLF सायबर हबमध्ये असलेल्या रेस्तराँ 'रास्ता' या व्यवस्थापकाने झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आहे. महिलेच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, "रास्ता" रेस्तराँचे संस्थापक आणि भागीदार गौतमेश सिंह म्हणाले, "मी वैयक्तिकरित्या या घटनेचा साक्षीदार आहे. संपूर्ण टीमच्या वतीने, मी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाचीही चूक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com