भाजप, सेनेसह राष्ट्रवादीला खिंडार? काँग्रेसमध्ये मेगा भरती

bjp shivsena ncp party workers will enters into congress
bjp shivsena ncp party workers will enters into congresse sakal

मुंबई : काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकांमध्ये (Municipal Corporation Elections) स्वबळाचा नारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये (Congress) मेगा भरती होणार आहे. भाजप (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेला (Shiv Sena) खिंडार पाडून राज्यातील महत्वाच्या पदावरील स्थानिक नेत्यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

bjp shivsena ncp party workers will enters into congress
Punjab Assembly Election: भाजप-आपचे देशात साटेलोटे - हिमांशू पाठक

मुंबईतील टिळक भवन येथे विविध पक्षातील महत्वाचे पदाधिकारी, अनेक विद्यमान तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, तब्बल २० हून अधिक विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्यांचा काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश समारोह आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवेशामागे खरा चेहरा काँग्रेसचे सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांचा असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा दिला होता. त्यासाठी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू होती. त्यावेळी मालेगावमध्ये काँग्रेसच्या माजी आमदार, महापौरांसह नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकारणात फोडाफोडी होते. त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायचे असते. आज आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले. उद्या त्यांचे कार्यकर्ते आमच्याकडे येतील, असं सांगून नाना पटोले यांनी संकेत दिले होते.

काय म्हणाले होते नाना पटोले? -

पक्ष सोडलेल्या नेत्यांनी नाराजी मांडण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीत काँग्रेसमधून काहीजण काँग्रेसमध्ये येणार आहे. आमचे नगरसेवक फोडले त्यांचे भविष्यात काय करायचं ते आम्ही ठरवू. महाविकास आघाडी असली तरीही हे राजकारण सुरूच असते. अशा राजकारणाला त्याचे भाषेत उत्तर देण्यासाठी काँग्रेस तयार आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com