हॉटेलमध्ये गोळीबार करत ५ जणांची हत्या, हॉटेल मालकिणीसह एकाच कुटुंबातल्या चौघांना संपवलं

Guwahati Hotel Shooting हॉटेल मालकिणीसह एकाच कुटुंबातील पाच जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं गुवाहाटीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Guwahati Hotel Shooting

Guwahati Hotel Shooting

esakal

Updated on: 

गुवाहाटीत सोमवारी रात्री हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जणंचा मृत्यू झाला आहे. हॉटेलचे मालक आणि ते भाड्याने घेतलेल्यांमध्ये झालेल्या वादातून ही गोळीबाराची घटना घडली. यात पाच जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जीएस रोडवर बोरा सर्विससमोर हॉटेल बिलास इनमध्ये ही घटना घडली. आसाम पोलीस मुख्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर हे हत्याकांड घडलं. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com