भारतात 60 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक: पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

आसाम जागतिक गुंतवणूकदार परिषदेला प्रारंभ

गुवाहाटी: आपल्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करत देशाला परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) जगात सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविले आहे. भारतात गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.

आसाम जागतिक गुंतवणूकदार परिषदेला प्रारंभ

गुवाहाटी: आपल्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करत देशाला परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) जगात सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविले आहे. भारतात गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.

आसामने आयोजित केलेल्या दोनदिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. या वेळी ते बोलत होते. "आसामचे हित ः भारताचा आसिआन देशांकडे जाण्याचा एक्‍स्प्रेस मार्ग' ही केवळ या परिषदेची टॅगलाइन नसून, ते एक व्यापक ध्येय असल्याचे मोदी यांनी नमूद केले. ते म्हणाले, ""एनडीए सरकारने आपल्या गेल्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत अनेक आर्थिक सुधारणा केल्या असून, त्यामुळे व्यवसाय करणे सुलभ व सोपे झाले आहे. सरकारने प्रशासकीय कामकाजात बदल करत त्याला गती दिली असून, सर्व कार्यक्रम आणि प्रकल्प नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.''

अर्थसंकल्पातील घोषणांबाबत बोलताना मोदी म्हणाले, ""जवळपास 45 ते 50 कोटी नागरिकांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार असून, यामुळे द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांत मोठ्या रुग्णालयांच्या उभारणीची शक्‍यता वाढली आहे. उज्वल योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना मोफत गॅसजोडणी देण्यात येणार आहे''
या वेळी भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, अरुणाचल प्रदेश, मणिपूरचे मुख्यमंत्री; तसेच 16 देशांचे दूत आणि उच्चायुक्त उपस्थित होते.

...तरच आर्थिक वृद्धीचा वेग वाढणार
ईशान्येकडील राज्ये व त्यामधील नागरिकांचा चौफेर विकास झाल्यानंतरच भारताच्या आर्थिक वृद्धीचा वेग खऱ्या अर्थाने वाढेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ""आम्ही "ऍक्‍ट इस्ट धोरण' तयार केले असून, ईशान्य भाग हा या त्याचा केंद्रबिंदू आहे. या धोरणासाठी लोकांमधील परस्पर संवाद वाढणे; तसेच पूर्वेकडील विशेषतः आसिआन देशांसोबत व्यापारिक संबंध वृद्धिगत होण्याची गरज आहे.''

Web Title: guwahati news india Foreign investment narendra modi