

Kerala has ordered a vigilance probe into allegations linked to Chief Election Commissioner Gyanesh Kumar’s tenure as Kerala PWD Secretary
esakal
केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुमारे २० वर्षे जुन्या प्रकरणाची दक्षता चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कुमार केरळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) सचिव असताना कथित अनियमितता झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांसोबतच २००६ मध्ये मलेशियन सिव्हिल इंजिनिअर ली सी बीन यांच्या जीवन संपवण्याचाही संदर्भ आहे.