Delhi Protest :ज्ञानेशकुमारांविरोधात ठिय्या ;इंडिया आघाडीचे नेते मैदानात ; ‘आकाशवाणी’ बनले ‘जंतरमंतर’

Gyanesh Kumar Resignation Demand, Rahul Gandhi Protest in Delhi. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले
Rahul Gandhi and Opposition MPs Stage Protest in Delhi Demanding CEC Gyanesh Kumar’s Resignation

Rahul Gandhi and Opposition MPs Stage Protest in Delhi Demanding CEC Gyanesh Kumar’s Resignation

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी  दिल्लीमध्ये आज विरोधकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. संसद भवन मार्गावर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या अडीचशेहून अधिक खासदारांनी जोरदार घोषणा देत परिसर अक्षरशः दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आंदोलनाला नाट्यमय कलाटणी देताना आकाशवाणी भवनाला ‘जंतरमंतर’चे स्वरूप आणले. रात्री आठच्या सुमारास राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत तेथून हटविले.  तासाभराच्या धरणे आंदोलनानंतर संपल्यासारखा वाटणारा  खासदारांचा मोर्चा रोखण्याची  मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांनी आखलेली रणनीती निष्प्रभ ठरली. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com