

Main Election Commissioner Gyanesh Kumar; a Supreme Court petition challenges alleged unilateral decisions related to electoral processes, Form 6 and ECINet.
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या कथित एकतर्फी निर्णयांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या या याचिकेत कायद्याचे उल्लंघन करून घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.