Gyanvapi Case: 'व्यासजी का तहखाना'त दररोज 5 वेळा होणार आरती, मुस्लिम पक्ष हायकोर्टात गेल्यानंतर हिंदू पक्षाची माहिती

Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी महत्वाची माहिती दिली आहे. व्यासजी का तहखाना येथे दिवसात पाच वेळा आरती करण्यात येणार आहे.
Gyanvapi Case
Gyanvapi Case

Gyanvapi Case: वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्या तळघराला 'व्यास जी का तहखाना' देखील म्हणतात. बुधवारी न्यायालयाने पुजेसाठी परवानगी दिल्यानंतर काही तासातच संध्याकाळी पूजा करण्यात आली. यावर मुस्लिम पक्षाने आक्षेप घेतला आहे.

दरम्यान ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी महत्वाची माहिती दिली आहे.  व्यासजी का तहखाना येथे दिवसात पाच वेळा आरती करण्यात येणार आहे. पहाटे ३:३०, दुपारी १२, सायंकाळी ४, संध्याकाळी ७ आणि रात्री १०:३० वाजता तळघरात आरती करण्यात येणार आहे, असे विष्णू शंकर जैन म्हणाले. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

व्यासजी का तहखाना, या अर्थ येथे हे व्यास कुटुंबाचे होते.  व्यास कुटुंबातील सदस्य जितेंद्र नाथ व्यास सांगितले की त्यांना तेथे प्रार्थना पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात चार 'तहखाने' (तळघर) आहेत त्यापैकी एक आजही व्यास कुटुंबाच्या ताब्यात आहे, जे तिथे राहत होते. व्यास यांनी वंशपरंपरागत पुजारी म्हणून त्यांना तहखान्यात पूजा करण्यास परवानगी द्यावी अशी याचिका जिल्हा न्यायालयात केली होती.

मुस्लिम बाजूने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी प्रशासनाने त्वरित काम केल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रशासन आणि याचिकाकर्ते यांचे संगनमत होते. मशीद समितीने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Gyanvapi Case
Gyanvapi Case: निवृत्तीच्या काही तास आधी दिला ऐतिहासिक निर्णय, मशिदीच्या तळघरात पुजेसाठी परवानगी देणारे न्यायाधीश कोण?

"प्रशासनाने रात्रीच्या उकाड्यात हे काम घाईघाईने हाती घेण्याचे कोणतेही कारण नाही कारण ट्रायल कोर्टाने दिलेल्या आदेशाने त्यांना आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी आधीच दिला होता. एवढी घाई करण्याचे स्पष्ट कारण आहे, असे मुस्लिम पक्षकारांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी हिंदूंना पूजा करण्यासाठी परवानगी देणारा आदेश पारित केला आणि सात दिवसांच्या आत तशी व्यवस्था करावी असे सांगितले. मात्र काही तासांतच व्यवस्था करण्यात आली आणि बुधवारी रात्री उशिरा तहखान्याचे दरवाजे उघडण्यात आले. पहाटे साडेतीनच्या सुमारास पहिली पूजा करण्यात आली. व्यास कुटुंबाने डिसेंबर १९९३ पर्यंत तहखान्यात पूजा केल्याचा दावा केला.

Gyanvapi Case
Gyanvapi Mosque Case: औरंगजेबाच्याही आधी पासून उभी आहे ज्ञानव्यापी मशीद? ASI रिपोर्टवर मुस्लिम पक्षाने केले मोठे दावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com