Gyanvapi Mosque: आणखी एक 'अयोद्ध्या' करायचं का? काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gyanvapi Mosque_UP
Gyanvapi Masjid: आणखी एक 'अयोद्ध्या' करायचं का? काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र

Gyanvapi Mosque: आणखी एक 'अयोद्ध्या' करायचं का? काँग्रेसचं भाजपवर टीकास्त्र

नवी दिल्ली : वाराणसीमधील ग्यानवापी मशिदीवर स्वस्तिकांच्या खुणा आढळून आल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान या खुणा आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. पण यावरुन आता काँग्रेसनं भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपला आणखी एक अयोद्ध्येसारखा वाद निर्माण करायचा आहे का? असा सवाल काँग्रेसनं केला आहे. (Gyanvapi Masjid case Cong leader slams BJP says it is looking for another Ayodhya issue)

या नव्या वादावर काँग्रेसचे वरीष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटलं की, हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. मी असू म्हणू शकतो की, अयोध्या वादावरील निर्णयानंतर भाजपची सध्याची स्थिती ही पंख छाटलेल्या पक्षासारखी झाली आहे. कारण त्यांना रोजगार, महागाई आणि अच्छे दिनवर राजकारण करता येत नाहीए. आता ते आणखी एक अयोध्या वादाचा शोध घेत आहेत. ग्यानव्यापी प्रकरणात राजकारणासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न अपयशी झालाय, असंही तिवारी यावेळी म्हणाले.

दरम्यान, ग्यानव्यापी मशीद हे मूळचे हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात येत आहे. या मंदिराचा कळस तोडून त्यावर मशिदीसारखा गोलाकार डोमची बांधणी करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर या मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम सध्या सरकारनं हाती घेतलं आहे. याचं व्हिडीओग्राफी करण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे. शनिवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान प्रशासनाने हे काम थांबवलं. त्यानंतर कोर्ट कमिशनरच्या टीममधील व्हिडिओग्राफर्सनी सांगितले की, ते सर्वेक्षण करत असताना त्यांना मशिदीच्या बाहेर दोन फिकट स्वस्तिक दिसले. स्वस्तिक शक्यतो प्राचीन काळी काढलेले असावेत, असे ते म्हणाले.

मशिदीवर देव-देवतांच्या प्रतिमांचा दावा

दिल्लीस्थित राखी सिंग, लक्ष्मी देवी, सीता साहू आणि इतर महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर ज्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत त्यांची पूजा करण्याची परवानगी मागितल्याच्या याचिकेनंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केले जात आहे.याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी म्हणाले की, मशिदी व्यवस्थापन समितीने केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालय सुनावणी करत नाही आणि आदेश देत नाही तोपर्यंत मशिदीचे सर्वेक्षण केलं जाणार नाही.