'EVM'मध्ये फेरफार करून दाखवाच; आयोगाचे आव्हान 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया घेण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सर्वांनाच हे आव्हान दिले आहे. 

नवी दिल्ली - 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार किंवा हॅकिंग करून दाखवाच, असे खुले आव्हान आता निवडणूक आयोगाने सर्वांना दिले आहे.

मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया घेण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सर्वांनाच हे आव्हान दिले आहे. 

'मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा दिवस या क्षेत्रातातील कोणत्याही तज्ज्ञ, संशोधक, तंत्रज्ञाने निवडणूक आयोगाकडे यावे आणि 'EVM' ज्शिन्समध्ये फेरफार करून दाखवावा,'' असे आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हे आव्हान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा दिवस वेगवेगळ्या पातळ्यांवर देता येईल. आयोगाने 2009 मध्ये देखील अशाच प्रकारचे जाहीर आव्हान दिले होते; मात्र त्या वेळी मतदान यंत्रात कोणीही हॅकिंग करू शकले नव्हते, असा दावा आयोगाने केला आहे.

Web Title: Hack an EVM challenge: Election Commission dares anyone to tamper voting device successfully