Haldwani BJP leader Assault : उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या गौलापर भागात रविवारी रात्री झालेल्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप गौलापर मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सध्या जिल्हा पंचायत सदस्यपदाच्या उमेदवार असलेल्या महिला नेत्याचा पती मुकेश बेलवाल आणि त्यांच्या समर्थकांवर काही लोकांनी हल्ला करून मारहाण केली. या घटनेत दोन समर्थक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.