
श्रीनगर विमानतळावर लष्कराच्या जवानाकडून जिवंत हँड ग्रेनेड जप्त
श्रीनगर : श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Srinagar International Airport) लष्कराच्या जवानाच्या सामानामध्ये तपसाणीदरम्यान जिवंत हातबॉम्ब (Hand Grenade) सापडला आहे. बॅगेज स्क्रीनिंगदरम्यान (Baggage Screening ) जवानाच्या चेक इन बॅगेजमधून हा ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बालाजी संपत असे लष्करी जवानाचे नाव असून, त्याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Hand Grenade Recovered From Army Troopers Bag)
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, बालाजी संपत हा तामिळनाडूतील वेल्लोर येथील रहिवासी असून, तो इंडिगोच्या विमानाने श्रीनगरहून चेन्नईमार्गे दिल्लीला जात होता. त्यावेळी बॅगेज स्क्रीनिंगदरम्यान जवानाच्या चेक इन बॅगेजमधून जिवंत ग्रेनेड असल्याचे आढळून आले. यानंतर बालाजी संपत याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा: स्वयंघोषित महाराज कालिचरण पुन्हा बरळला; म्हणाला...
मूळचा तामिळनाडूच्या वेल्लोर येथील रहिवासी असलेला बालाजी हा रजेवर गेला होता. तेथून तो इंडिगोच्या विमानाने श्रीनगरहून चेन्नईमार्गे दिल्लीला जात होता. प्रवासापूर्वी करण्यात येणाऱ्या स्क्रीनिंगवेळी श्रीनगर येथील विमानतळावर कर्मचाऱ्याला बालाजी याच्या बॅगेजमध्ये ग्रेनेड असल्याचे आढळून आले. त्यानंतर हा ग्रेनेड जप्त करण्यात आला असून, बालाजी याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, बालाजीकडे हा ग्रेनेड कसा आला आणि अशा पद्धतीने सोबत घेऊन जाण्यामागचा नेमका त्याचा उद्देश काय होता. याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Web Title: Hand Grenade Recovered From Army Trooper At Srinagar Airport
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..