
स्वयंघोषित महाराज कालिचरण पुन्हा बरळला; म्हणाला...
अलिगड : स्वयंघोषित कालिचरण महाराजाने (Kalicharn Maharaj) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. काश्मीरमध्ये (Kashmir) लाखो महिलांवर अत्याचार झाले आणि हे सगळीकडे होणार आहेत. कारण, संपूर्ण देशात छोट्या-छोट्या प्रमाणात पाकिस्तानची निर्मिती होत आहे. त्यामुळे हिंदूंनी बेसावध राहू नये असे कालिचरण महाराजने म्हटले आहे. अलिगड (Alighar) येथील संत परिषदेदरम्यान कालिचरण याने हे प्रक्षोभक भाषण केलं आहे. यापूर्वी कालिचरण याने महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. (Kalicharan Maharaj Controversial Statement )
हेही वाचा: राज ठाकरेंना औरंगाबादची सभा महागात? कारवाईबाबत गृहमंत्री म्हणतात...
एवढेच नव्हे तर, हिंदुंनी धर्माच्या (Hindu Religion) नावावर मतदान केलं पाहिजे. मुस्लिमांचं तुष्टीकरण करणाऱ्या नेत्यांना घाम फुटला पाहिजे असे विधान त्याने केलं आहे. काश्मीरप्रमाणे तुमच्याही आई-बहिणींवर अत्याचार होतील असे म्हणत तुम्ही काय कराल? असा प्रश्नदेखील कालिचरणयाने उपस्थित केला आहे. भारतात केवळ सनातन धर्म असून, इस्लाम-ख्रिश्चन हे धर्मच नसल्याचे तो म्हणाला. राजकीय इच्छाशक्तीतून हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते असेदेखील त्याने म्हटले आहे.
हेही वाचा: उत्तराखंडच्या शाळेत वेद, रामायणासह गीता शिकवावी : शिक्षणमंत्री रावत
महात्मा गांधींबद्दलच्या वक्तव्यानंतर खावी लागली होती जेलची हवा
यापूर्वीदेखील कालिचरण महाराजाने अनेकदा वादग्रस्त विधान केले आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे मागील डिसेंबर महिन्यात महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) कालिचरण महाराजाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी त्याने मी नथूराम गोडसे (Naturam Godase) यांना सलाम करतो की, त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त विधान केलं होते. त्यानंतर त्याला तुरुंगाची (Jail) हवा खावी लागली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
Web Title: Kalicharan Maharaj Controversial Statement In Aligarh Says Vote For Religion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..