Video: 'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!'

handicap girl complete race video viral on social media
handicap girl complete race video viral on social media

नवी दिल्ली: 'हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!' हे बाजीगर चित्रपटातील अभिनेता शाहरुख खाने याने म्हटलेले वाक्य. या वाक्याचा प्रत्येय एका व्हिडिओमध्ये आला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटिझन्स मुलीचे कौतुक करत आहे.

खेळामध्ये हार-जीत असतेच. पण, जिद्द आणि चिकाटीही तेवढीच महत्त्वाची असते. एका मैदानावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पाय गमावलेल्या मुलीच्या जिद्दीला नेटिझन्सनी दाद दिली आहे. शिवाय, आपल्याला विचार करण्यास नक्की भाग पाडत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलींमध्ये धावण्याची शर्यत लावण्यात आली आहे. स्पर्धक मुलींमध्ये एक दिव्यांग मुलगी आहे. तिला एक पाय नाही. पण, ती शर्यतीत सहभागी झाली आहे. शर्यतीचा निकाल काय लागला, कोण जिंकलं, याला फार महत्त्व उरलेच नव्हते. त्या दिव्यांग मुलीला धावताना पाहून प्रेक्षकही उभे राहून टाळ्या वाजवताना दिसतात. यापेक्षाही नेटिझन्स कौतुक करताना दिसत आहे. कारण, संबंधित व्हिडिओ जगभर व्हायरल होत आहे.

दरम्यान, जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांचा जीव घेतला आहे. शिवाय, लॉकडाऊनमुळे अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्विकारताना दिसतात. अशा परिस्थितीत या मुलीकडे पाहून खूप handicap girl complete race video viral on social mediaकाही शिकायला मिळते. संकटात न खचता त्याचा सामना करण्याची प्रेरणा देणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. पण, व्हायरल झालेल्या व्हिडिओला तोड नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com