अभिनेत्री म्हणते, कुलभूषण यांना वाघा सीमेवर फाशी द्या

वृत्तसंस्था
सोमवार, 22 जुलै 2019

अभिनेत्रीने कुलभूषण जाधव यांना वाघा सीमेवर फाशी देण्याचे ट्विट केले आहे. ट्विटनंतर नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे.

नवी दिल्लीः पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून (आयसीजे) दिलासा मिळाला आहे. मात्र, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने कुलभूषण यांना वाघा सीमेवर फाशी देण्याचे ट्विट केले आहे. ट्विटनंतर नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे.

वीणा मलिक ही सतत वादग्रस्त वक्तव्ये करत असून, वादाच्या भोवऱयात अडकत असते. कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलासा दिला. मात्र, वीणा मलिक हिने ट्विटरवरून अकलेचे कांदे तोडले. कुलभूषण जाधव यांचे काही छायाचित्र पोस्ट करत, कॅप्शनमध्ये तिने 'दहशतवादी आणि खूनी कुलभूषण जाधव यांच्या प्रती कोणत्याही प्रकारची सहानभुती दाखवता कामा नये. तुम्ही जे पेराल तेच उगवेल.' असे लिहले आहे. कुलभूषण जाधव यांना वाघा सीमेवर फाशी देण्यात यावी म्हटले आहे. यानंतर तिला नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. 'बिग बॉस ४' शोच्या माध्यमातून वीणा प्रकाशझोतात आली होती. याच दरम्यान तिचे नाव अस्मित पटेल सोबत जोडले गेले होते. यामुळे नेटिझन्सनी तिला धारेवर धरले आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी व दहशतवादीच्या आरोपाखाली एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारतामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या याचिकेवर न्यायालयाने 15 विरुद्ध एक अशा मतांनी बुधवारी (ता. 17) हा निकाल दिला. व्हिएन्ना कराराचे उल्लंघन पाकिस्तानकडून झाल्याचेही न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. व्हिएन्ना कराराच्या कलम 36 (1) नुसार, जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार पाकिस्तान जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत कुलभूषण यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा स्थगित राहील, असा महत्त्वपूर्ण निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hang Kulbhushan at Wagah border says pakistani actress veena malik