हनुमान हा तर आर्य! : सत्यपाल सिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

हनुमानाची जात कोणती या मुद्यावर सर्व प्रकारची चर्चा चालू असतानाच आता केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमान हा आर्य असल्याचे भाकीत केले आहे.

नवी दिल्ली : हनुमानाची जात कोणती या मुद्यावर सर्व प्रकारची चर्चा चालू असतानाच आता केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमान हा आर्य असल्याचे भाकीत केले आहे. 'राम-हनुमानाच्या काळात कोणत्याही जाती नव्हत्या, त्यामुळे हनुमान हा आर्य होता.' असे सत्यपाल सिंह यांनी सांगितले. 

यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे म्हणले होते, त्यानंतर केंद्रीय आदिवासी आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साई यांनी हनुमान आदिवासी असल्याचे म्हटले होते. आदिवासींमध्ये 'गिध', 'रिच', 'टिग्गा' अशा जाती होत्या, त्यातील टीग्गा म्हणजे वानर. यामुळे हनुमान हा आदिवासी होता असे साई यांनी सांगितले. 

योगी आदित्यनाथ यांनी केलेले वक्तव्य हे दलितांची मते मिळवण्यासाठी केलेली खेळी आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी केला. या तिघांनी केलेल्या हनुमानाच्या जातीबाबतच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. 

Web Title: Hanuman is from Aryan says satyapal singh