'हनुमान आदिवासी, दलित नव्हे तर जैन'

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

भोपाळः हनुमान हे अदिवासी, दलित नव्हे तर जैन होते, असे जैन धर्माचे आचार्य निर्भय सागर यांनी म्हटले आहे. आचार्य निर्भय सागर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणीकेचे वातावरण आहे. येथून 25 कि.मी. अंतरावर असलेल्या पंचबालयती जैन मंदिरात पत्रकारांशी बोलताना आचार्य निर्भय सागर म्हणाले, 'हनुमान हे अदिवासी, दलित नव्हे तर जैन होते. जैन ग्रंथांमध्ये हनुमान हे जैन असल्याचा उल्लेख आहे. जैन धर्मामध्ये 24 कामदेव होते. त्यापैकी हुनमान हे एक आहेत. हनुमान हे प्रथम क्षत्रिय होते. परंतु, वनवासासाठी जंगलात गेल्यानंतर त्यांनी जैन धर्माची दिक्षा घेतली होती.'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होता असे म्हटले होते. हनुमान म्हणजेच मारूतीराया हा हिंदू धर्मातला असा देव आहे जो वनवासी आहे, डोंगर दऱ्यांमध्येच राहतो, दलित आणि वंचित आहे. असे असले तरीही मारूतीरायाने सगळ्या देशाला जोडण्याचे काम केले. बजरंग बलीचा आदर्श आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Web Title: Hanuman was Jain says Aacharya Nirbhay Sagar Maharaj