कर्नाटकात झाला हनुमानाचा जन्म; निवडणुकीपूर्वी भव्य मंदिराची योजना

Hanumana was born in Karnataka; Plan for a grand temple before the election
Hanumana was born in Karnataka; Plan for a grand temple before the electionHanumana was born in Karnataka; Plan for a grand temple before the election

नवी दिल्ली : कर्नाटक राज्य सरकारने अधिकाऱ्यांना भव्य हनुमान मंदिर बांधण्याचे आदेश दिले आहेत. हे मंदिर अंजेनाद्री पर्वतावर बांधले जाईल. जिथे हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते. हे मंदिर अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराच्या धर्तीवर बांधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये मे २०२३ च्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत या मंदिराचा फायदा भाजपला निवडणुकीत घ्यायचा आहे. (Hanumana was born in Karnataka; Plan for a grand temple before the election)

कर्नाटक (Karnataka) आणि आंध्र प्रदेशमध्ये हनुमानाच्या खऱ्या जन्मस्थानावरून गदारोळ सुरू आहे. कर्नाटकातील विविध मंत्र्यांचे म्हणणे आहे की, रामायणात हंपीजवळील अंजेनाद्री पर्वताचे वर्णन आहे. त्यानुसार याच ठिकाणी राम आणि लक्ष्मण यांची रामायणात हनुमानाची भेट झाली. येथे हनुमानासह राम, सीता आणि अंजना देवी यांचीही मूर्ती आहे.

Hanumana was born in Karnataka; Plan for a grand temple before the election
मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

दुसरीकडे डिसेंबर २०२० मध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानम यांनी आंध्र प्रदेशातील विविध मंदिरांवर देखरेख करणारे तज्ञ पॅनेल तयार केले होते. त्यात वैदिक विद्वान, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इस्रोचे शास्त्रज्ञ यांचाही समावेश होता. अहवालात हनुमान स्थानाबाबत दावा करण्यात आला आहे. नंतर एप्रिल २०२१ मध्ये समितीने दावा केला की हनुमानाचा जन्म आंध्र प्रदेशातील अंजनाद्री पर्वतावर झाला होता. त्यामागील समजुतींसह ज्योतिषशास्त्रीय आणि वैज्ञानिक पुरावेही दिले गेले.

हंपी हे रामायणातील किष्किंधा

एकीकडे हनुमानाचा जन्म राज्याच्या उत्तरेकडील हंपीजवळील किष्किंधा येथील अंजेयानंद्री टेकडीवर झाल्याचा कर्नाटकचा दावा आहे. कर्नाटकातील (Karnataka) भाजप (BJP) सरकारला अयोध्येतील राम मंदिराला पर्यटन कॉरिडॉरच्या माध्यमातून येथील हनुमान मंदिराशी जोडायचे आहे. त्यासाठी हे हनुमान मंदिर आणखी भव्य बनवण्याची योजना आहे. हे मंदिर तुंगभंद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि जागतिक वारसा हम्पीपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. हंपी हे रामायणातील किष्किंधा आहे. तिथे माकडांचे राज्य होते असे मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com