Osho birth Anniversary : ओशोंचा मृत्यू हत्या की षडयंत्र, 32 वर्षानंतरही गुढ कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osho birth Anniversary

Osho birth Anniversary : ओशोंचा मृत्यू हत्या की षडयंत्र, 32 वर्षानंतरही गुढ कायम

ऐंशीच्या दशकात जगभरात खूप चर्चेत आलेलं नाव म्हणजे रजनिश अर्थात ओशो. अध्यात्माची एक परिभाषा सांगत अनेकांचा थक्क करणारी त्यांची जीवनसरणी होती. त्यामुळे ते अनेकदा वादात आले. त्यांना सेक्स गुरु म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. ओशोंच्या जीवन जितकं वादग्रस्त होतं तितकाच त्यांचा मृत्यूसद्धा.

ओशो यांचे 19 जानेवारी 1990 रोजी पुण्यातील कम्युनमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मृत्यू हा एक षडयंत्र होतं, असाही आरोप करण्यात आला होता. एवढंच काय तर त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी असाही वारंवार मागणी केली जाते.

ओशोंचा मृत्यू हत्या होती की षडयंत्र याविषयी आजही गुढ कायम आहे. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.

  • ओशोंचा मृत्यू हार्ट अटॅकनी झाल्याचं बोललं जातं. मात्र, त्यांच्या मृत्यूविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

  • मृत्यूच्या दिवशी 19 जानेवारी 1990 रोजी आश्रमात अनेक डॉक्टर असताना डॉ. गोकुळ गोकणी या बाहेरच्या डॉक्टरांना का बोलवण्यात आले?

  • याच डॉ गोकुळ गोकणी एक धक्कादायक खुलासा केला होता की ओशोंचे जवळचे डॉक्टर देवराज आणि जयेश यांना मृत्यूच्या शेवटच्या वेळी खोलीत बंद ठेवले. सोबतच गोकणी यांना मृत्यूचे मायोकार्डियल इन्फेक्शनमुळे झाले असल्याचे सांगण्यात आले होते.

  • याशिवाय हू किल्ड ओशो या पुस्तकात लेखक अभय वैद्य यांनी ओशोंना मेडिसीनचा ओव्हरडोजमुळे विषबाधा झाल्याचे सांगितले होते.

हेही वाचा: Osho Ashram: 'संभोग से समाधी' ओशो आश्रमात नक्की काय चालतं? HIV टेस्टशिवाय...

ओशोंना मृत्यूनंतर लगेच त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. ओशोंच्या मृत्यूनंतर तासाभरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यूवर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

19 जानेवारीला जेव्हा ओशोंची तबियत जेव्हा खालावली तेव्हा त्यांची आई आश्रमात होती पण आश्चर्याचं म्हणजे त्यांना काहीही सांगण्यात आलं नाही.

ओशोंच्या सेक्रेटरी नीलम मीडियाशी बोलताना सांगितले होते की जेव्हा मी त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या आईला सांगितली तेव्हा त्यांनी ओशोची हत्या करण्यात आल्याचे नीलमला सांगितले होते. त्यावेळी नीलमने ही आरोप करण्याची योग्य वेळ नसल्याचे त्यांना समजावून सांगितले होते.

हेही वाचा: Osho birthday : अमिताभसोबत ब्रेकअप, रेखालाही जायचं होतं ओशोंच्या आश्रमात

  • 2013 मध्ये जयेशच्या अंडर असणारे ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने ओशोंचे मृत्युपत्र युरोपियन न्यायालयासमोर सादर करत त्यांच्या सर्व मालमत्तेवर आपला दावा केला. नंतर फॉरेन्सिक चेकअपनंतर सादर केलेले मृत्युपत्र बनावट असल्याचे समोर आले आणि खटला मागे घेण्यात आला.

  • असंही म्हणतात की अमेरिका ओशोला घाबरायचा आणि जेव्हा ओशो अमेरिकेच्या जेलमध्ये होचे त्यावेळी त्यांना स्लो पॉइजन दिले जायचं ज्यामुळए त्यांचा मृत्यू झाला.

  • याशिवाय त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या मृत्यूच्या 27 वर्षानंतर सीबीआयची मागणी केली होती. आजही अनेकदा त्यांचे अनुयायी त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करतात.