
Osho birth Anniversary : अमिताभसोबत ब्रेकअप, रेखालाही जायचं होतं ओशोंच्या आश्रमात
बॉलीवूड हे चित्रपटांशिवाय अनेक कारणांसाठी चर्चेत असते. मग लव्ह अफेअर असो की आणखी काही. तो काळ रेखाचा. रेखा ही बॉलीवूडची टॉप एक्ट्रेस म्हणून ओळखली जायची. रेखाचं आयुष्य फिल्मी आयुष्यासोबतच वैयक्तीक आयुष्यही तितकंच गाजलं.
रेखाच्या आयुष्यात एक असा टर्न आला होता की तिला ओशोंच्या आश्रमात जायचं होतं, याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.
रेखाचं अनेक अभिनेत्यांसमोर नावं जोडली गेली मात्र तिची सर्व लव्ह स्टोरी अपूर्णच राहल्या आणि रेखा एकटी पडली. मग जितेंद्र असो की किरण कुमार, विनोद मेहरा, अमिताभ बच्चन एवढंच काय तर संजय दत्त आणि अक्षय कुमारसोबतही रेखांचं नाव जोडलं गेलं. दिल्लीच्या मुकेश अग्रवाल सोबत त्यांनी लग्न केलं मात्र तेही नातं फार काळ काही टिकलं नाही.
1980 च्या सुरवातीला जेव्हा भारतात आध्यात्मिक गुरु रजनीश म्हणजेच ओशो यांचा प्रभााव वाढला होता तेव्हा बॉलीवूडमध्येही याचा प्रभाव दिसून आला. महेश भट्ट, विनोद खन्ना, विजय आनंद सारखे निर्माते, लेखक आणि अभिनेत्यांचा यात समावेश होता. अनेक लोक ओशो यांना ‘सेक्स गुरु’ म्हणायचे.
हेही वाचा: Osho Ashram: 'संभोग से समाधी' ओशो आश्रमात नक्की काय चालतं? HIV टेस्टशिवाय...
विनोद खन्ना ओशोपासून इतके प्रभावित झाले की 1982 मध्ये ते ओशो यांच्यासोबत आश्रमात राहायला गेले. हा तोच काळ होता जेव्हा रेखा यांचं अमिताभ यांच्यासोबत ब्रेकअप झालं होतं आणि त्या दिवसांमध्ये अचानक अमिताभ आणि परवीन बाबी यांच्या जवळीकतेची चर्चा रंगली होती.
यामुळे रेखाला चांगलाच धक्का बसला होता. तेव्हा निराश रेखाला ओशोंच्या आश्रमात जायचं होतं मात्र रेखाने त्यावेळी अनेक चित्रपट साइन केले होते त्यामुळे तिला तिथे जाऊ शकली नाही. मात्र तिने बोलून दाखवलेल्या या इच्छेमुळे ती खूप काळ चर्चेत राहली.