हर घर तिरंगासाठी वीस रुपये द्या; शिक्षण विभागाचे वादग्रस्त परिपत्रक

जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण विभागाच्या परिपत्रकाने नवा वाद; मुख्याध्यापकांवर जबाबदारी
har ghar tiranga campaign govt directs to collect rs 20 from each students in higher secondary schools
har ghar tiranga campaign govt directs to collect rs 20 from each students in higher secondary schoolsSakal

श्रीनगर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० रुपये देण्यास सांगण्यात आले असून शिक्षण विभागाचे परिपत्रकही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही अनंतनाग नगरपालिकेचे कर्मचारी राष्ट्रध्वजासाठी २० रुपये मागत असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. बडगाममधील चादुरा विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांनी १६ जुलै रोजी केलेल्या परिपत्रकानुसार मुख्याध्यापकांना विद्यार्थी व शिक्षक-कर्मचाऱ्याकडून प्रत्येकी २० रुपये घेऊन ते चार दिवसांत शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. जर एखाद्या कुटुंबात एकापेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर केवळ एकाच विद्यार्थ्याकडून पैसे घ्यावेत, असे नमूद करण्यात आले आहे. पीडीपीचे नेते आणि माजी आमदार गुलाब नाबी लोन हंजुरा यांनी हे परिपत्रक सोशल मीडियावर पोस्ट केले व सवाल उपस्थित केला.

उपमुख्य शिक्षणाधिकाऱ्यांकडून सारवासारव

या वादग्रस्त परिपत्रकाबद्दल बडगामचे उपमुख्य शिक्षणाधिकारी इंद्रजितसिंह यांनी स्पष्टीकरण दिले. हे परिपत्रक नजरचुकीने जारी करण्यात आले असून विद्यार्थ्यांना देणगी ऐच्छिक असेल. संबंधित विभागीय शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शुद्धिपत्रक जारी केले आहे, असे त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून जणूकाही शत्रूचा प्रदेश असल्याप्रमाणे काश्मीरला वागणूक दिली जात आहे. विद्यार्थी, दुकानदारांवर राष्ट्रध्वजासाठी पैसे देण्याची सक्ती केली जात आहे. राष्ट्रीयत्व हे नैसर्गिकरित्या येते. ते लादता येत नाही.

- मेहबूबा मुफ्ती, अध्यक्ष, पीडीपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com