Delhi High Court: पतीवर नपुंसकत्वाचा खोटा आरोप, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे क्रूरता; हायकोर्टाची महत्वाची टिप्पणी

पती-पत्नीच्या वादात घटस्फोट मंजूर करणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महिलेच्या अपील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वाची निरीक्षणे नोंदवली.
Delhi High Court
Delhi High CourtSakal

Delhi High Court: दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नीच्या वादात अनोखा निर्णय दिला आहे. एका महिलेने आपल्या पतीवर कार्यालयीन महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करणे ही एक प्रकारची मानसिक क्रूरता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच जर एखादी महिला आपल्या पतीच्या पुरुषत्वाबद्दल आरोप करते किंवा त्याला नपुंसक म्हणते आणि चाचणी करण्यास भाग पाडते, ही देखील मानसिक क्रूरता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

पती-पत्नीच्या वादात घटस्फोट मंजूर करणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या महिलेच्या अपील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वाची निरीक्षणे नोंदवली. या जोडप्याचे 2000 मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यात वाद निर्माण झाले.

पतीने आरोप केला आहे की पत्नी अनेकदा त्याच्याबद्दल वाईट बोलते. ती लोकांना सांगायची की सासू तिला मारहाण करते आणि तिच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि तिच्या कुटुंबाने हुंडा घेतला आहे. तसेच   पत्नीने त्याला नपुंसकत्व चाचणी करण्यास भाग पाडले, असे आरोप पतीने केले होते. (Latest Marathi News)

प्रकरण दिल्ली हायकोर्टात -

हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेल्यानंतर न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पत्नीने तिच्या पतीच्या 'मर्दपणा'बद्दल केलेले आरोप अत्यंत निराशाजनक आणि मानसिकदृष्ट्या वेदनादायक असू शकतात. हे शेवटी मानसिक क्रूरता आणि पतीच्या छळ असल्याते सिद्ध होते. हुंड्याची मागणी, विवाहबाह्य संबंधांचे आरोप आणि पतीला नपुंसकत्व चाचणीसाठी भाग पाडणे, हे मानसिक त्रास आणि आघात होण्यासाठी पुरेसे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

Delhi High Court
Nana Patekar Comment On 2024 Election : 'पुन्हा बीजेपीच येणार, पर्याय आहे कुठं'? नानांनी स्पष्टच सांगितलं!

पत्नीने पतीवर केलेले आरोप बदनामीकारक -

सुनावणीदरम्यान हायकोर्टाने म्हटले की, अपीलकर्त्याच्या (पत्नी) कबुलीजबाब हे सिद्ध होते की प्रतिवादीला नपुंसकत्व चाचणी करावी लागली. ज्यामध्ये तो तंदुरुस्त आढळला. पुरुषाच्या पुरुषत्वाबद्दल असे दावे आणि आरोप केवळ निराशाजनकच नाहीत तर कोणत्याही पुरुषाला स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या वेदनादायक देखील आहेत.

पत्नीने पतीवर केलेले आरोप बदनामीकारक आणि बिनबुडाचे होते. पती-पत्नींना जाहीरपणे लाज आणणारे आणि अत्यंत क्रूरतेचे असे हे आरोप होते. पत्नीने पतीचा सार्वजनिक अपमान केला आहे. कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये देखील इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. ऑफिसमधील इतर महिलांना त्रास दिला, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Delhi High Court
Purna-Parli Passenger Train: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; चौकशी सुरू...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com