Hardeep Singh Puri
esakal
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उत्तर प्रदेशमधून मिळालेल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यसभा सभापतींनी त्यांचा राजीनामा १४ नोव्हेंबर २०२६ पासून मंजूर केला आहे. राज्यसभा सचिवालयाने याबाबत अधिकृत बुलेटिन जारी करून माहिती दिली आहे.